Thu, Jun 24, 2021 10:57होमपेज › Kolhapur › राजू शेट्टींविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात 

राजू शेट्टींविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात 

Published On: Mar 22 2019 4:41PM | Last Updated: Mar 22 2019 4:41PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवेसेनेमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेने पहिल्या यादीमधून २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये २१ पैकी १९ विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीने  स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. मागील निवडणूकीत शेट्टी यांनी विद्यमान काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आव्हाडे यांचे वडील कल्लापा आव्हाडे यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी २००९ मध्ये शेट्टी यांनीच धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना पराभवाची धुळ चारली होती. 

दुसरीकडे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातूनही संजय मंडलिक यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. कोल्हापूरातुन प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेमधुन धैर्यशिल माने हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यांना लोकसभेत पाठविण्यासाठी कामाला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महिन्याच्या सुरवातीला झालेल्या बैठकीत दिला होता.