Sat, Jan 25, 2020 22:18
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी सतेज पाटील यांचीच वर्णी; भंडाऱ्याची जबाबदारी विश्वजित कदमांकडे! 

कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी सतेज पाटील यांचीच वर्णी; भंडाऱ्याची जबाबदारी विश्वजित कदमांकडे! 

Last Updated: Jan 15 2020 5:31PM

संग्रहित छायाचित्रपुढारी ऑनलाईन डेस्क 
 

कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे आले आहे.  कार्यभार स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांनी नकार दिल्यानंतर सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे विश्वजित कदम यांना  भंडाऱ्यांची जबाबदारी देण्यात आली आहे  

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरच्या, तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगरच्या पालकमंत्रिपदी नेमण्यात आले. सतेज पाटील यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. या नियुक्त्यांवरून तीनही मंत्री नाखूश झाले. विश्‍वजित कदम यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले नव्हते. 

काँग्रेसने १२ पालकमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला ११ आल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आमच्यातील सहकारी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारेल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब यांनी दिली आहे. त्यामळे गृह राज्यमंत्री सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री झाले आहेत.