Tue, Oct 20, 2020 10:42होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : जवान सहदेव रजपूत अनंतात विलीन

कोल्हापूर : जवान सहदेव रजपूत अनंतात विलीन

Last Updated: Sep 28 2020 1:50PM
नूल (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

भारतीय सेनेत कार्यरत असलेले निलजी (ता. गडहिंग्लज) येथील जवान सहदेव बाळसिंग रजपूत (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने पुण्याच्या लष्करी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘वीर जवान..तुझे सलाम..., भारत माता की जय... अशा घोषणा देत भावपूर्ण वातावरणात साश्रूनयनांनी  निरोप देण्यात आला.

वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात 530 बाधित; 12 मृत्यू

रजपूत हे गेल्या २४ वर्षापासून भारतीय सैन्यदलात आर्मी सर्व्हिस कोअर विभागात पुणे येथे सेवेत होते. गेल्या दोन महिन्यांपासून यकृताच्या आजाराने ते त्रस्त होते. पुण्यातील लष्करी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने निलजी गावावर शोककळा पसरली. वृत्त समजताच तहसिलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी पार्थिवाचे दर्शन व अंत्यसंस्काराची तयारी केली.

वाचा : कोल्हापूर : सीपीआरमध्ये आगीचा थरार; जीवाची पर्वा न करता 'त्यांनी' कोरोना रुग्णांना वाचवलं!

शनिवारी रात्री पार्थिव गावात येताच जवान सहदेव अमर रहे....वीर जवान तुझे सलाम... अशा घोषणा देण्यात आल्या. रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी रांगोळ्या घातल्या होत्या. पार्थिवाची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. शासन व जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तहसीलदार पारगे यांनी श्रद्धांजली वाहिली. अश्रुपूर्ण नयनांनी जवानास निरोप देण्यात आला. रजपूत यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी चंद्रकांत पांगे, सपोनि दिनेश काशीद, मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई, सरपंच माणिक नाईक, तलाठी सुनीता काटे, ग्रामसेवक संजय पाटील, पोलिस पाटील सतीश काळापगोळ आदींसह आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

वाचा : कोल्हापूर:  सीपीआरचे फायर ऑडिट करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 "