Fri, Jul 03, 2020 00:08होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण

कोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण

Last Updated: May 29 2020 10:26PM

file photoगारगोटी (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

भुदरगड तालुक्यात आज नव्याने पुन्हा सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने भुदरगड तालुकाच्या खात्यावर ५८ रूग्णांची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. आज पुन्हा नव्याने सहा रुग्ण आढळल्याने तालुक्यातील नागरिक धस्तावले आहेत.

मुंबई येथून पाटगाव येथे आलेल्या दोघांना हायस्कूल शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाटगावमधील रूग्णांची संख्या चार वर पोहोचली आहे. पळशिवणे येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन केलेला एक जण पॉझिटिव्ह आढळून आला असून या गावातील रूग्ण संख्या दोन झाली आहे. बश्याचा मोळा येथील प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन केलेले दोघे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बश्याचा मोळा गावात रुग्णांची संख्या ३ झाली आहे. नागणवाडी येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन केलेला एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या सर्व गावात प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे.