Sun, Mar 29, 2020 00:27होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये भूकंप; तीन तालुकाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये भूकंप; तीन तालुकाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 

Last Updated: Jan 01 2020 2:32PM

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील सडोलीकरकौलव : प्रतिनिधी

करवीरचे काँग्रेसचे निष्ठावंत आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील सडोलीकर यांना मंत्रिपद डावलल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. पी. एन. पाटील हे पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत असतानाच आज कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन तालुकाध्यक्षांसह सहा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

वाचा : तिन्ही पक्षांत नाराजीनाट्य; समजूत काढण्याचे आव्हान

आमदार पाटील यांनी पक्ष सोडावा यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी आज बुधवारी फुलेवाडी येथे आज अमृत मल्टीपर्पज कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला संतप्त कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आहे.

पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुप्रिया साळोखे, करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर, राधानगरी विधानसभा समन्वयक सुशिल पाटील कौलवकर, सेवादल अध्यक्ष सुभाष पाटील सिरसेकर यांच्यासह एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. यामुळ कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

वाचा : कोल्हापूर काँग्रेसमध्ये भूकंपाची चिन्हे पी. एन. पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत

पी. एन. पाटील सडोलीकर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. आ. पाटील यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्ष सांभाळताना जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. सहापैकी चार विधानसभा निवडणुकांत पक्षातील काही नेल्यांनीच फंदफितुरी करून आ. पाटील यांचा निसटता पराभव घडवून आणला तरीही पाटील यांनी संयम पाळला होता. २००४ साली आ. पाटील यांचे जिवलग मित्र कै. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही मंत्रीपदापासून पाटील यांना वंचित ठेऊनही आ. पाटील यांनी पक्षावरील निष्ठा ढळू दिली नव्हती, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.