Fri, Jul 10, 2020 01:59होमपेज › Kolhapur › गिरगावमधील रक्तदाता शिवसैनिक

गिरगावमधील रक्तदाता शिवसैनिक

Published On: Jun 06 2019 4:50PM | Last Updated: Jun 06 2019 4:50PM
कोल्हापूर :  पुढारी ऑनलाईन 

कोणत्याही पाठबळाविना केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून गिरगांव येथील शिवसैनिक सर्जेराव कोंडेकर गेल्या सात वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित करत आहेत. या माध्यमातून आतापर्यत त्यांनी शेकडो बाटल्या ब्लड बँकेत जमा केल्या आहेत. 

सर्जेराव कोंडेकर गेल्या सात वर्षापासून अव्याहतपणे मित्र परिवाराच्या अतुल्य सहकार्याने गिरगावमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करत आहेत. आतापर्यंत त्यांनी रक्तदानातून शेकडो बाटल्या रक्त संकलित करून शासकीय तसेच खासगी ब्लड बँकेत जमा केले आहे. या सामाजिक कार्यातून सर्जेराव कोंडेकर यांनी वेगळा आदर्श उभा केला आहे.सर्जेराव कोंडेकर यांच्या रक्तदान कार्याला ग्रामस्थांकडून तसेच ग्रामपंचायतकडून मोलाचे सहकार्य लाभत आहे. सरपंच संध्या पाटील यांचे विशेष सहकार्य रक्तदानासाठी लाभले.