Tue, Jun 15, 2021 13:17
शिवाजी विद्यापीठातील 30 जणांना उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, अधीक्षकपदी पदोन्नती

Last Updated: Jun 06 2021 7:28AM

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या पदोन्नती अखेर शिवाजी विद्यापीठाने केल्या आहेत. 30 जणांना सेवाज्येष्ठतेनुसार उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश विद्यापीठ प्रशासनाने शनिवारी काढला आहे.

वर्षभरापासून विद्यापीठातील विविध पदांच्या पदोन्नती विविध कारणांमुळे थांबल्या होत्या. कोरोनामुळे यात अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने आंदोलन केले. यात पदोन्नतीची मागणी करण्यात आली होती. कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू होता. विद्यापीठाने संबंधितांना आर्डर काढल्या असून, उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लेखनिक, कनिष्ठ लेखनिक, जमादार, हवालदार, ग्रंथालय परिचर आदी पदांवर 30 जणांना नियमानुसार रोस्टरप्रमाणे पदोन्नती दिल्या आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.