Tue, Jul 07, 2020 07:33होमपेज › Kolhapur › सत्तेला वेटोळे घातलेल्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी सतेज पाटील आमच्या सोबत

सत्तेला वेटोळे घातलेल्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी सतेज पाटील आमच्या सोबत

Published On: Mar 17 2019 1:53AM | Last Updated: Mar 17 2019 12:09AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी

खासदारकी, आमदारकी, सहकारी संस्था व स्थानिक संस्थांवर वेटोळे घालून बसलेल्या प्रवृत्तीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठीच आ. सतेज पाटील व आम्ही एकत्र आलो आहोत, असे प्रतिपादन प्रा. संजय मंडलिक यांनी केले. उचगाव येथे सेना-भाजप युतीच्या लोकसभा प्रचाराच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार होते.

प्रा. मंडलिक म्हणाले,  संसदरत्नसारखे पुरस्कार  विकत घेणार्‍यांनी जनतेचे किती प्रश्‍न सोडवले ते जाहीर करावे. गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात न गेल्याने या गावांना विकास निधी मिळालाच नाही  मग हा निधी गेला कुठे? याचा जाब मतदार खासदारांना विचारत आहेत. त्यामुळे विचलीत झालेल्या खासदारांनी साडी वाटपाचा फंडा काढला आहे. 

जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या पदांवर वेटोळे घालून बसलेल्या अशा प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी आ. सतेज पाटील यांनी माझ्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली आहे. शिवसेना भाजप आणि आ. सतेज पाटील यांच्या भक्कम एकजुटीतून ‘कोल्हापूर दक्षिण’मधून  मताधिक्य आपल्याला मिळेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मधुकर चव्हाण, सुजित  चव्हाण, पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे,  शशिकांत खोत, सरपंच मालुताई गणेश काळे,  राजू यादव,  पोपट दांगट आदीसह  कार्यकर्ते उपस्थित होते.