ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह 

Last Updated: Sep 18 2020 4:56PM
Responsive image


कोल्हापूर :  पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आला. आपल्या संपर्कातील आलेल्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, शक्य असल्यास तपासणी करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.

वाचा : 'मायक्रो फायनान्स कंपन्यांनी तोपर्यंत व्याज आणि हप्ते वसूल करू नयेत'

गेल्या पाच महिन्यापासून मंत्री हसन मुश्रीफ मंत्रालय, अहमदनगर, कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, कागल आदी ठिकाणी सतत लोकांच्या संपर्कात येत आहेत. सकाळपासून मुश्रीफ यांच्याकडे लोकांची लोंढा लागलेला असतो. आतापर्यंत सातत्याने काळजी घेत असतानाच त्यांना संपर्कातील लोकांमुळेच कोरोनाचा संसर्ग झाला.

वाचा :असे असेल आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम

गुरूवारी संध्याकाळी ते मुंबईतून मंत्रालयातील कामकाज आटोपून कोल्हपूरला रवाना झाले. काल अंगात ताप आणि कणकणी असल्याने मुश्रीफ यांनी शुक्रवारी सकाळी स्वॅब तपासणी केली. दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यानंतर सायंकाळी त्यांनी एचआरसिटी स्कॅन करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरी किंवा दवाखान्यातच थांबणार आहेत. पुढील काही दिवस कोणालाही भेटणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राऊत यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे केले आहे.

वाचा :मुंबई, पुण्याचा दूधपुरवठा रोखण्याचा प्रयत्न

पुणे : हडपसर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार


मराठा क्रांती मोर्चाचा मातोश्रीवर ७ नोव्हेंबरला मशाल मोर्चा


कोरोनामुळे तुळजापुरातील कोजागिरी पौर्णिमेची यात्रा निर्मनुष्य


धुळे : अर्धवट पुरलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह


बारामती : अल्पवयीन मुलीस आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


लेट नाईट वेब सिरीज बघण्याच्या सवयीने वाचवला ७५ लोकांचा जीव


तब्बल ८५ दिवसांनी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी


भारताला ५ जी नेटवर्कसाठी जपानची मिळणार साथ!


नाशिक जिल्ह्यातील जवान अरुणाचलमध्ये शहीद


शरद पवारांप्रमाणे जो बायडेन यांनाही आवरला नाही पावसात सभा घेण्याचा मोह!