Fri, Dec 04, 2020 03:58होमपेज › Kolhapur › हेअर स्टाईल, मेकअप आज कार्यशाळा

हेअर स्टाईल, मेकअप आज कार्यशाळा

Last Updated: Jun 26 2020 11:15PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

आजच्या जगात बाह्यसोैंदर्याला महत्त्व दिले जाते. काळानुरूप आज प्रत्येकजण सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार आपली हेअरस्टाईल, मेकअप कसा असावा, असा प्रश्न प्रत्येक महिलेला सतावत असतो. त्यातच लग्नसमारंभ अथवा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास हा प्रश्न जरा जास्तच तीव्र होतो. 

याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने फेसबूक लाईव्ह हेअर स्टाईल आणि  मेकअप बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आज शनिवारी (दि. 27) सायंकाळी 5 वाजता ही कार्यशाळा होणार असून, सोनाली गायकवाड या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. 

दररोज आणि विशेष समारंभासाठी उपयोगी पडतील, अशा विविध हेअर स्टाईल्स आणि मेकअप कार्यशाळेत शिकवले जाणार आहेत. याशिवाय मेकअप आणि हेअर स्टाईल काय करावी या प्रश्नांची उत्तरे कार्यशाळेतून सहजतेने मिळणार आहेत. कार्यशाळेत सहभागाकरिता फेसबूकवर /र्झीवहरीळघर्रीीीींळ किंवा र्ऽिीवहरीळ ेपश्रळपश हे पेज सर्च करा, लाईक करा आणि फॉलो करा. अधिक माहितीसाठी  8483926989, 9096853977  या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.  कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तुम्हाला नंतरही र्झीवहरीळ र्एींशपीीं या यूट्युब चॅनेलवर पाहता येणार आहेत.