Wed, Dec 02, 2020 09:29होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये पशुसंवर्धन जोपासण्याची पोमाजे कुटुंबियांची परंपरा (video)

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये पशुसंवर्धन जोपासण्याची पोमाजे कुटुंबियांची परंपरा (video)

Last Updated: Jul 04 2020 3:40PM
कुरुंदवाड : जमीर पठाण

कर्नाटक आणि महाराष्ट्रात राज्यात बैलागाडी शर्यतीच्या माध्यमातून कुरुंदवाड आणि पोमाजे घराण्याचं नाव सर्वदूर पोहोचवले. अशा आण्या (गोड्डयाळ) बैलाचे महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त पूजा करून त्याला गोडधोड जेवण घातले आणि पशुसंवर्धन जोपासण्याची परंपरा पोमाजे कुटुंबीयांनी जपली आहे.

पोमाजे कुटुंबीयांनी जोपासलेल्या आणण्या बैलाने बैलगाडी शर्यतीतून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून कर्नाटक-महाराष्ट्र राज्यात इतिहास निर्माण करून कुरुंदवाडची पताका सर्वदूर पोहोचवली आहे.

उमाजी कुटुंबीयांनी १९७८ सालापासून गजा नावाच्या बैलाला पहिल्यांदा शर्यतीत उतरवले. यामध्ये त्यांना यश प्राप्त होऊन प्रथम क्रमांक मिळाला. तेव्हापासून शर्यतीचा त्यांना छंद लागला. त्यानंतर त्यांनी गजा बैजा फुल्या व पाखऱ्या यांना घेऊन त्यांचे संगोपन करून केले. त्यांना मैदानात उतरवले. या मैदानाच्या माध्यमातून बैलगाडी शर्यत शौकिन म्हणून प्रसिद्धी मिळाली. 

कागल, बुधगाव, डिग्रज, बेनाडी एकसंबा अशा ठिकाणी होणाऱ्या लाखो रुपयांच्या बैलगाडी शर्यतीत आण्या बैलाने आंतर राखत प्रथम क्रमांक पटकावत. लाखो शर्यत शौकीनांच्या मनामध्ये घर निर्माण करत हिंदकेसरी आण्या म्हणून आपले नावलौकिक केले. त्यामुळे पोमाजे घराण्याचे नावही महाराष्ट्र-कर्नाटक राज्यासह इतर राज्यात दूरपर्यंत पोहोचले आहे.

वाचा - इचलकरंजीत बड्या नेत्याच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलासह नातवाला लागण 

आण्या बैलाच्या संगोपनावरून बोलताना महावीर पोमाजे म्हणाले, बैलाला दररोज गरम पाण्याने अंघोळ घालून शेळीचे दहा लिटर दूध, सत्वयुक्त भरडा सकाळ-संध्याकाळ देण्यात येते. एखाद्या मुलाप्रमाणे त्याचे संगोपन केले जाते. हे या संगोपनाची जाण राखत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत आमची गाडी १८ नंबरला होती. याठिकाणी आण्या बैलाने प्रथम क्रमांक गाठत सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडत हृदयी स्पर्शी स्पर्धा जिंकली होती.

पोमाजे कुटुंबीयातील धनपाल पोमाजे, राजेंद्र पोमाजे, सुदर्शन पोमाजे, दीपक पोमाजे, बंडू पोमाजे, सुरेश बिंदगे यांनी पशुसंवर्धन जोपासले आहे.