Sat, Dec 05, 2020 01:12होमपेज › Kolhapur › देवींचे लाईव्ह दर्शन आता 'पुढारी ऑनलाईन'वर

नवरात्रौत्सव : देवींचे लाईव्ह दर्शन पाहा आता 'पुढारी ऑनलाईन'वर

Last Updated: Nov 04 2020 11:48AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या फैलावापासून बचावासाठी देशभरातील मंदिरे दर्शनासाठी बंद झाली. पंरतु आता नवरात्रौत्सवात तुम्हाला घरबसल्या देवींचे दर्शन घेता येणार आहे. करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवी सह राज्यातील विविध जिल्ह्यातील अनेक मंदिरातील देवींचे लाईव्ह दर्शनाची सुविधा पुढारी ऑनलाईनच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि लाईव्ह दर्शन. https://www.pudhari.news/live_darshan.php

तसेच, नवरात्र उत्सव आणि नवरंग हे समीकरण आता घट्ट जुळले आहे. महिला या नऊ दिवसांत ठरलेल्या नवरंगांनुसार वस्त्रे परिधान करतात. नवरात्रीतील हे रंग अधिक खुलवण्याची संधी दैनिक ‘पुढारी’ने उपलब्ध केली आहे. या काळात नवरंगांनुसार परिधान केलेल्या वस्त्रांतील तुमची छायाचित्रे आता थेट दैनिक पुढारीच्या www.pudhari.com या वेबसाईटवर झळकणार आहेत.

त्यामुळे आपले नातेवाईक व मित्रपरिवारापर्यंत तुमचा हा नवरंगातील अनोखा लूक तुम्ही शेअर करू शकणार आहात. वेबसाईटवरून तुम्हाला तुमची छायाचित्रे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस् अ‍ॅप आदी समाजमाध्यमांवरही सहज शेअर करता येतील. 

पुढारी ऑनलाईनवर फोटो कसे शेअर कराल?

1. तुमचे हे फोटो शेअर करण्यासाठी www.pudhari.com या वेबसाईटवर भेट द्या. होमपेजवर नवरंग फोटो गॅलरी-सहभागी व्हा, या बटणवर क्लिक करा.

2. किंवा सोबत दिलेल्या क्युआर कोड आपल्या स्मार्ट फोनमध्ये स्कॅन करा. येथून आपण थेट फोटो अपलोड करू शकता.