Sat, Jan 25, 2020 22:27
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सावरकर, गोडसेप्रकरणी संजय राऊत गप्प का होते : चंद्रकांत पाटील

सावरकर, गोडसेप्रकरणी संजय राऊत गप्प का होते : चंद्रकांत पाटील

Last Updated: Jan 14 2020 11:09AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यावरून शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी प्रखर टीका केली होती. आता या टिकेवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपले परखड मत मांडले आहे. त्यांनी मोदी यांच्या पुस्तकावर निशाणा साधणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली.  

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मोदी यांचे 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' हे पुस्तक मुळात भाजपचं अधिकृत पुस्तक नाही. या पुस्तकाबद्दल तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते म्हणा, पण त्यावरून तुम्ही भाजपवर राग का काढता?"

'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' या प्रकाशित झालेल्या वादग्रस्त पुस्तकावर राज्यात शिवसेनेसह सर्व पक्ष, संघटनांनी निदर्शने केली. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर टीका केली. 

सावरकर-गोडसेंबाबत अपशब्द वापरले गेले तेव्हा राऊत गप्प का बसले? असाही सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.