होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्‍लब फेसबूक लाईव्हमध्ये ‘नातेसंबंधांचा मुरांबा’

कस्तुरी क्‍लब फेसबूक लाईव्हमध्ये ‘नातेसंबंधांचा मुरांबा’

Last Updated: Jun 01 2020 12:53AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अनेक पिढ्या चालत आलेली कुटुंबव्यवस्था टिकून राहावी, कुटुंबातील नातेसंबंध द‍ृढ व्हावेत आणि व्यक्‍तींमधील संवाद वाढावा, यासाठी दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने ‘नातेसंबंधांचा मुरांबा’ या फेसबूक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 1 जून रोजी दुपारी 4 वाजता ‘नात्यांचा आंबट-गोड मुरांबा’ सहकुटुंब चाखता येणार आहे. सायकॉलॉजिस्ट काऊन्सिलर उर्मिला चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रथम भाग नुकताच आपण कस्तुरी क्लबच्या फेसबूक पेजवर live बघितला. आता त्याचाच दुसरा भाग सोमवारी पाहायला मिळणार आहे.

नाते अधिक समृद्ध करण्यासाठी या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. नात्यांचा सुरेख मेळ साधण्यासाठी फेसबुकवर PudhariKasturi connectkolhapur सर्च करा आणि लाईक करा किंवा https://www.facebook. com/groups/650188125423230/?ref=share वर लॉगईन करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8483926989, 9096853977 कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ यू ट्यूबवर Pudhari Events येथे पाहता येणार आहेत.