Tue, Jun 15, 2021 13:22
मराठा समाज्याच्या आंदोलनाची तारीख ठरली, आमदार खासदारांनी बोलण्याची वेळ आलीय

Last Updated: Jun 10 2021 6:18PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. संभाजीराजेंनी आज कोल्हापुरात आंदोलनाची तारीख जाहीर केली. १६ जून राेजी कोल्हापुरात पहिला मराठा समाजाचा आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती त्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

अधिक वाचा : दाढी तेवढी करा! पीएम मोदींना बारामतीच्या चहावाल्याने १०० रूपयांची मनी ऑर्डर पाठवली

यावेळी संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्‍नी करण्‍यात येणार्‍या आंदोलनाचे ब्रीद 'आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय' असे असेल. आंदोलनादिवशी आम्ही बोलणार नाही. आता लोकप्रतिनिधींना बोलावे लागणार आहे. मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी कायम पुढे होऊन जबाबदारी घेतली आहे. समाजाच्या हितासाठी आमदार, खासदार काय करणार हे त्यांनी सांगयला हवे, असे आवाहनही त्‍यांनी केले.  

अधिक वाचा : महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस

मी मुंबईतील बैठकीत काही मुद्दे मांडले होते या मुद्दांवर चर्चाही झाली नाही, अशी खंतही संभाजीराजेंनी व्यक्त केली. मागीलवेळी मराठा समाजाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात मोर्चो काढले त्याची दखल सरकारने घेतली नाही. यावर आपण काय बांगड्या भरल्या आहेत का? आपल्याला एकदाच जोर लावायला हवा पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

अधिक वाचा : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध : हसन मुश्रीफ

मराठा समाजासाठी राज्यातील खासदार आणि आमदारांनी जबाबदारी घेण्याची गरज आहे. आमदार खासदारांना तुम्ही समाजासाठी काय हे कोणी विचारले का? आजच्या बैठकीतील दिशा ही फक्त कोल्हापुरसाठी नाही तर राज्याच्या दृष्टीने ही भूमिका घेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.