Fri, Feb 28, 2020 23:58होमपेज › Kolhapur › अब तक... 57

अब तक... 57

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 15 2018 11:37PMकोल्हापूर : दिलीप भिसे

संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे उखडण्यासाठी म्होरक्यांसह साथीदाराविरुद्ध पोलिसांनी बेधडक कारवाईचा सपाटा लावला आहे. वर्षभरात 9 टोळ्यांतील 57 गुन्हेगारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई झाल्याने समाजात दहशत माजविणार्‍या टोळ्या धास्तावल्या आहेत. कारवाईची तात्पुरती मलमपट्टी न ठरता लैंगिक शोषण, सामान्यांची पिळवणूक अन् पडद्याआड दडून काळ्याधंद्यांचे साम्राज्य उभारणार्‍या ‘सम्राटा’वरही ‘ब्रह्मास्त्रा’ची मात्रा लागू होणार का? हा प्रश्‍न आहे. 

भाईगिरी अन् विलासी जीवनशैलीकडे झुकलेली सतरा ते पंचवीस वयोगटातील तरणी पोरंही गुन्हेगारीच्या जाळ्यात सापडू लागली आहेत. वाढती बेकारी, व्यसनाधिनता, गुन्हेगारी, मित्रांच्या संगतीमुळे अनेक गोरगरीब घराण्यातील पोरांनी  आयुष्याची राखरांगोळी करून घेतल्याचे भयावह चित्र दिसून येते.

मोका, तडीपार अथवा ‘एमपीडीए’च्या विळख्यात सापडलेल्या संशयितांत ओठावर मिसरूडही न फुटलेल्या उमद्या पोरांचा भरणा अधिकच दिसून येतो. तडीपार झालेल्यांपैकी बहुतांशी तरुण सामान्य, मोलमजुरी करणारी आहेत. हे वास्तव्य अन् विदारक चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍याविरुद्ध ही कारवाई सुरूच राहणार यात शंका नाही, मात्र क्षणिक कारणासाठी भरकटलेल्या मनाच्या परिवर्तनासाठी समाजधुरीनांकडून काही प्रयत्न होणार का? हा मुद्दा आहे. 

मोक्‍का अंतर्गत कारवाईचा टोळ्यावरील बडगा!

सागर नाईक, नेताजी मोहिते, अवधूत लुगडे, प्रदीप ऊर्फ बिल्डर सातवेकर, प्रवीण जाधव, मिलिंद सोकासणे, आकाश मोरे, अविनाश ऊर्फ जर्मनी गॅग-आकाश भिलुगडे, नईम कुक्कुटनूर, बजरंग फातले, प्रशांत काजवे, मनोज शिंगारे, शामराव रंगाराव लाखे-मुबारक शेख,पैंगबर मुजावर ऊर्फ पठाण, हरिकिशन पुरोहित, सनी ऊर्फ संतोष बगाडे, सनी मोहिते, साजिद ऊर्फ टिपू बाळू ऊर्फ दस्तगीर नाईक,अभिजित संकपाळ, रियाज हैदर, दीपक अनिल सावंत, किरण ऊर्फ अमर बगाडे,अक्षय भोसले, मनीष सांगावकर, सुखदेव ऊर्फ छोट्या ढावारे.

मुन्‍ना मुसाचा भाईजान टोळीवर निशाना

गुंड्या ऊर्फ मुसा जमादार,अविनाश टेके, शीतल टेके, जुबेर कोठीवाले, ईस्माईल मुजावर, टोळीतील साथीदारांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य केल्याप्रकरणी एका महिलेवर मोक्‍का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अविनाश माने ऊर्फ आज्या लातूर, शुभम हळदकर ऊर्फ पीर सुभ्या, विशाल माने ऊर्फ गोट्या लातूर. कर्नाटकातील काडय्या-इरय्या गॅग-काडय्या पुजारी, ईरय्या मठपती, गुलाबसाहेब मुलतानी, बसाप्पा मांग, कल्लाप्पा मेलमट्टी, मेहबूब मुलतानी, परशराम ऊर्फ परसू मांग.  उम्याभाई गँग- उमेश आरबोळे, संजय तारदाळे, शौकत आरकाटे, अर्जुन रानभरे, राजू आरबोळे, चंद्रशेखर नाईक. सुरज्या गोंद्या टोळी- सुरज दबडे, गोविंद माळी, ओंकार सूर्यवंशी, विराज कारंडेसह दोन अल्पवयीन मुलांनाही मोक्‍काची मात्रा लागू झाली आहे.

आयुष्याची राखरांगोळी !

‘मोका’अंतर्गत कारवाई झालेल्या सुरज्या गोंद्या, उम्याभाई, आज्या लातूर, मुन्‍ना मुसाची भाईजान,सनी बगाडेची एसबी बॉईज,जर्मनी आणि आर्याभाई गँगमधील बहुतांशी सराईत 18 ते 25 वयोगटातील आहेत. त्यापैकी संशयित कॉलेजचे विद्यार्थी आहेत. 

केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संगतीमुळे कोवळी मुले पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहेत. ‘मोका’अंतर्गत कारवाईचा बडगा उगारल्याने त्याच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. सुधारण्याचे अनेक मार्ग असले तरी गुन्हेगारी पाशातून त्याची सुटका होणार का? हा प्रश्‍न आहे.

शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संशयितावर कारवाईचा बडगा शक्य असला तरी कोवळ्या वयात मुलांकडून होणार्‍या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण थक्‍क करणारे आहे. मोका, तडीपार झालेल्या संशयितांच्या वयाचा विचार केल्यास वाट चुकलेल्या तरुणांना वेळीच सावरण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- संजय मोहिते, 
पोलिस अधीक्षक , कोल्हापूर