Sun, Sep 27, 2020 00:39होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात चालढकल : आमदार क्षीरसागर

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात चालढकल : आमदार क्षीरसागर

Published On: Dec 22 2017 6:07PM | Last Updated: Dec 22 2017 6:07PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांना हटवून पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी जून महिन्यापासून जनआंदोलन सुरू आहे. विधानसभा सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नास उत्तर देताना, राज्य शासनाने ही मागणी मान्य केली असून हिवाळी अधिवेशापूर्वी शिर्डी, पंढरपूर देवस्थानच्या धर्तीवर श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यात येणार असल्याची ग्वाही विधी व न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली होती.  परंतु, या मूळ मुद्द्याला बगल देऊन पगारी पुजारी नेमण्याच्या प्रश्नावर चालढकल केली जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज, केला. अधिवेशन संपत आले तरी या प्रश्नावर साधी चर्चा करण्याची तसदी शासनाने घेतलेली नाही. याविषयी तीव्र आंदोलन उभे करून शासनाचा  हा डाव हाणून पाडू, असा इशारा कोल्हापूर शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांनी हिवाळी अधिवेशनात दिला. 


कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार मा.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रकाश आबीटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार रमेश लटके यांनी “शासनाचा कासव गतीचा कारभार. श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणूक कायद्यावर शासन का गप्पगार” अशा आशयाचा फलक घेऊन विधानभवनाच्या पायर्यांवर धरणे आंदोलन केले. यासह मंदिरात भाविकांची होणारी लूट थांबवून, श्री अंबाबाई मंदिरात जमा होणाऱ्या देणगीतून मंदिराचा विकास करण्यासाठी आणि परगावाहून येणाऱ्या भाविकांना मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी शासनाने तातडीने पगारी पुजारी नेमावेत, अशी मागणी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे आमदार क्षीरसागर यांनी केली आहे.