Thu, Feb 27, 2020 23:13होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : हो...ना...हो...करत अखेर ठरलं; चंदगडमधून राजेश पाटील यांना तिकीट

कोल्हापूर : हो...ना...हो...करत अखेर ठरलं; चंदगडमधून राजेश पाटील यांना तिकीट

Published On: Oct 03 2019 1:10PM | Last Updated: Oct 03 2019 1:10PM

राजेश पाटीलकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० उमेदवारांची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज गुरुवारी जाहीर केली. त्यात ४ विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधून राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. डॉ. नंदा बाभूळकर यांनी काल, बुधवारी राजकीय संन्यास जाहीर केला. यामुळे राष्ट्रवादीकडून राजेश पाटील हेच निवडणूक रिंगणात राहणार हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार त्यांची आज राष्ट्रवादीकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

आता त्यांच्यासमोर गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जुळवून घेण्याचेच आव्हान असणार आहे. डॉ. बाभूळकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून स्वहस्ताक्षरात पत्र पाठवून आपण पाच ऑक्टोबरपर्यंत संपर्कात राहणार नसल्याचे कळविले आहे. यामुळे आता पुन्हा त्या निवडणूक रिंगणात येण्याचा प्रश्न राहिलेला नाही. राष्ट्रवादीचे गडहिंग्लजमधील काही कार्यकर्ते मात्र नव्या जोडणीला लागले असून, त्यातून पक्षातील उमेदवारी भरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

संध्यादेवी कुपेकर यांनी १९ सप्टेंबर रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अचानकपणे घेऊन आपण निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत डॉ. बाभूळकर यांनीही निवडणूक लढवू नये, असा निर्णय जाहीर केला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. त्या भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे भाजप प्रवेशाला विरोध असणार्‍या कार्यकर्त्यांनी दुसर्‍याच दिवशी बैठक घेऊन याबाबत नाराजी व्यक्त केली.