Wed, Jun 03, 2020 01:36होमपेज › Kolhapur › राहुल गांधींनी मैदानातून पळ काढला : अमित शहा

राहुल गांधींनी मैदानातून पळ काढला : अमित शहा

Last Updated: Oct 10 2019 2:41PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकोल्हापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्रात निवडणुका सुरु आहेत, राहुल गांधी मात्र प्रचारात दिसत नाही, त्यांनी मैदानातून पळ काढला अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. कोल्हापूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. मैदानातून पळ काढणे राजकारणात योग्य नाही, विरोधी पक्षाने खरे तर सामोरे जायला पाहिजे, हे म्हणजे पराभव आधीच मान्य केल्यासारखे आल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा आमचे दोन खासदार होते तेव्हाही आम्ही प्रचार करत होतो,आम्ही कधी पळ काढला नाही असेही त्यांनी सांगितले.