Fri, Dec 06, 2019 06:23होमपेज › Kolhapur › भाजपमध्ये प्रवेशासाठी कार्यकर्ते रांगेत : चंद्रकांत पाटील 

भाजपमध्ये प्रवेशासाठी कार्यकर्ते रांगेत : चंद्रकांत पाटील 

Published On: Mar 22 2019 8:13PM | Last Updated: Mar 22 2019 8:13PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

भाजप शिवसेना युतीच्या प्रचार शुभारंभात आणखी काही कार्यकर्ते प्रवेश करतील. या प्रचार सभेस किमान चार ते पाच लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

राज्‍यातील युतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्‍हापूरातून होणार असल्‍याने पाटील यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्‍यान, युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात आमदार अमल महाडिक ही उतरतील असेही ते म्हणाले. 

दोनच दिवसांपूर्वी गारगोटीमध्ये बोलतानाही पाटील यांनी आघाडीवर हल्‍लाबोल केला होता. ते म्‍हणाले की, शरद पवारांची विश्‍वासार्हता आता संपली असुन त्यांच्या आघाडीतील लोकांची रिघ लागली आहे. आघाडीला उमेदवार मिळेनात अशी विरोधकांची दाणादाण झाली आहे. आघाडीमधील अजुन काही बडी घराणी संपर्कात आहेत. नाशिकमधील आदीवासी समाजाच्या बड्या घराण्यातील भारती पोवार यांना भाजपमध्ये आणणार आहे. भाजपमध्ये दाखल होणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे.

थोडं वेट अ‍ॅन्ड वॉच करा शेवटच्या क्षणी हे बाँब फोडले जातील असा इशारा ना. पाटील यांनी दिला होता. २४ मार्चला युतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्‍हापुरातून होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.