Fri, Sep 25, 2020 13:31होमपेज › Kolhapur › कोयना धरणातून २७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयना धरणातून २७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Published On: Aug 14 2019 1:40PM | Last Updated: Aug 14 2019 1:16PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : प्रतिनिधी

राधानगरी धारणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून २७ हजार ०१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज (ता. १४) दिली. 

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी ४३ फूट असून, एकूण ५३ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ८.२४ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

 पंचगंगा नदीवरील - राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी. कुंभी नदीवरील- कळे (खा). वेदगंगा नदीवरील- निळपण व  वाघापूर. हिरण्यकेशी नदीवरील- गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे व गजरगाव. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी असे एकूण 53 बंधारे पाण्याखाली आहेत. 

नजिकच्या अलमट्टी धरणात १०५.८७२ टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात १००.९३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा 

तुळशी 3.35  टीएमसी, वारणा 32.59 टीएमसी, दूधगंगा 24.46 टीएमसी, कासारी 2.66 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.55 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.44, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 43 फूट, सुर्वे 42.6 फूट, रुई 75.6 फूट, इचलकरंजी 74 फूट, तेरवाड 77.3 फूट, शिरोळ 71.11 फूट, नृसिंहवाडी 71.11 फूट, राजापूर 59.3  फूट तर नजीकच्या सांगली 41.3 फूट आणि अंकली  48.6 फूट अशी आहे.