Wed, Sep 23, 2020 20:19होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, लहान मुलासह दोन जखमी 

कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, लहान मुलासह दोन जखमी 

Last Updated: Feb 15 2020 11:47AM

कोल्हापूर - कसबा सांगाव येथे घरगुती गॅस स्फोटात दोघे जखमी. कसबा सांगाव (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे घरगुती गॅसला अचानक लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला. यामध्ये अब्दुल बकक्ष नदाफ (वय ५५) व त्यांचा नातू तैजब (वय ६) हे जखमी झाले आहेत. 

ग्रामपंचायत जवळ मुल्ला मोहल्ल्यात असणाऱ्या अब्दुल नदाफ यांच्या घरी मुलाच्या लग्नानिमित्त पाहुणे आले असतानाही ही दुर्देवी घटना घडली. सकाळी आठच्या सुमारास गॅस चालू असताना अचानक आग भडकली. दुसऱ्या मजल्यावर झोपलेला नातू तैजब याला आगीची झळ बसल्याने तो जखमी झाला. बघता-बघता आगीने रुद्रावतार धारण केला. शेजारी रफिक नदाफ, आशफाक नदाफ यांना घेऊन अब्दुल नदाफ यांनी पेटलेल्या गॅस टाकीला काढण्याचे धाडसी काम केले. यामध्ये ते जखमी झाले. गॅस टाकी बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एक लाखांहून अधिक रकमेच्या प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले असून घरातील विवाहच्या कार्यक्रमासाठी आणलेली सुमारे ४०,००० रोख रक्कमही जळाली आहे. 

गावकामगार तलाठी जीवन कोळी, पोलिस पाटील, छाया हेगडे, कागल पोलिस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, कॉन्स्टेबल आर.आर. पाटील, बाळू पेटकर, पी.व्ही.भोसले यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

 "