Fri, May 29, 2020 01:05होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : स्पोर्ट्स बाईक अपघातातील दुसऱ्या जखमीचा मृत्‍यू 

कोल्‍हापूर : स्पोर्ट्स बाईक अपघातातील दुसऱ्या जखमीचा मृत्‍यू 

Last Updated: Nov 08 2019 2:23PM
कोल्‍हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कँटीन रस्त्यावर काल (गुरूवार)  भरधाव दुचाकीची समोरच्या कारला धडक बसून गंभीर अपघात झाला होता. यामध्ये मंदार पाटील याचा जागीच मृत्‍यू झाला होता. दरम्‍यान या अपघातातील संकेत पाटील याचा आज (शुक्रवार) पहाटे उपचारादरम्‍यान दुर्देवी मृत्‍यू झाला.

मंदार पाटील व संकेत पाटील हे दोघेही भारती विद्यापीठात शिकत होते. काल (गुरुवार) सायंकाळी हे दोघेही स्पोर्ट्स बाईकवरून घरी जात होते. दरम्‍यान शिवाजी विद्‍यापीठ ते मिलिटरी कँटीननजीकच्या रोडवर त्‍यांचा अपघात झाला होता. यावेळी दुचाकीस्वार मंदार मधुसूदन पाटील (वय १९, रा. नागाळा पार्क कमानीजवळ) याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला होता. तर त्‍याच्या पाठीमागे बसलेल्‍या संकेत बाजीराव पाटील (वय २०, रा. शिवाजी पेठ) हा गंभीर जखमी झाला होता. त्‍याच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज (शुक्रवार) पहाटे दुर्देवाने त्‍याचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.