Thu, Feb 27, 2020 22:43होमपेज › Kolhapur › पुढारी रिलीफ फाऊंडेशनमध्ये दोन दिवसात 57 लाख जमा, मदतीचा ओघ सुरूच

पुढारी रिलीफ फाऊंडेशनमध्ये दोन दिवसात 57 लाख जमा, मदतीचा ओघ सुरूच

Published On: Aug 12 2019 9:14AM | Last Updated: Aug 12 2019 9:14AM
कोल्हापूर: प्रतिनिधी

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दै. ‘पुढारी’ने पुढारी रिलीफ फाऊंडेशन स्थापन केले आहे. त्यानुसार फाऊंडेशनला मदतीचा ओघ सुरू झाला असून रविवारी लाखांवर निधी जमा झाला. एकूण दोन दिवसात 57 लाख 15 हजार 137 रुपये फाऊंडेशनमध्ये जमा झाले आहेत. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला आहे. महापुराच्या थैमानाने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांना बळ देऊन त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी दै. ‘पुढारी’ने ‘पुढारी रिलीफ फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. दै. ‘पुढारी’च्या आवाहनाला जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रत्येक आपत्तीच्या काळात दैनिक पुढारी संकटग्रस्तांच्या पाठिशी उभा राहिला आहे. भूकंप, पुरासह नैसर्गिक आपत्तीवेळी सामाजिक बांधिलकीतून ‘पुढारी’ने आपत्तीग्रस्तांसाठी भरीव निधी उभा केला आहे. महापुराच्या या संकट काळातही ‘पुढारी’ लोकांसोबत आहे.

 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढारी व्यवस्थापनाने स्वत:च्या 51 लाखांच्या निधीने सुरुवात केली आहे. पुढारी रिलिफ फाऊंडेशनकडे पूरग्रस्तांसाठी शनिवार व रविवार या दोन दिवसात देणगीदाराचा ओघ सुरू झाला आहे.

देणगी दिलेल्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे :

कोल्हापूर : पंढरीनाथ खाडे 2 हजार, जयेश पटेल 1100, अशोक काळे 500, नारायण कोल्हे 251, प्रतिमा कोल्हे 251. 

सातारा : मार्बल अ‍ॅण्ड सॅनिटेशन सोशल असो. 21 हजार, उर्मिला आपटे 6 हजार, आशीर्वाद हॉस्पिटल 5 हजार, नंदकुमार साखरे 5 हजार, सुरेश महामुलकर 2 हजार, नरपतसिंह रजपूत 1 हजार, एम. जे. माने 500 रुपये, प्रो मावळे 1 हजार, कृष्णात जाधव 300, राधेय फूडस् - ओझर्डे 500, सौ. लता नलवडे 1 हजार, प्रमोद निकम 1200, दिलीप कदम 1 हजार, शामराव जोशी1 हजार, श्रीरंग कात्रे 1 हजार, रवींद्र मोरे (भांबवली) 1 हजार, लहू दुदुस्कर (शाहुपूरी) 1 हजार, शरद वाईकर 500, बबनराव काकडे 501, सुनील लेंभे 1 हजार, दिलीप पोवार 500, रोहिणी पोवार 500, श्री साई प्रायमरी स्कूल 1 हजार, पुतळाबाई निंबाळकर (कोंडवे) 500, प्रमोदकुमार महामुनी (गोडोली) 1 हजार, अनुराधा आपटे 500, प्रमिला कुलकर्णी 500, चंद्रकांत चांगण 251, रोहित घाडगे 200, बी. खामकर 151, श्रीराम 100, साईश निंबाळकर (कोंडवे) 100, तन्मय निंबाळकर कोंडवे 100, अशी एकूण 56 हजार 903 रुपयांची रक्‍कम जमा झाली.

कराड : विजयानंद चॅरिटेबल ट्रस्ट कराड 25 हजार, हाजी बरकत महम्मद मुल्‍ला शार्प एजन्सी मलकापूर 11 हजार, सुन खवळे बनवडी कॉलनी 1200, स्वरा सचिन शिंदे मलकापूर 1 हजार , देवयानी सतीश मोरे कराड 726, वसंत शंकर रंगाटे विद्यानगर 501, संजय तातोबा देशमुख 1 हजार, रामचंद्र पाटील, जखिणवाडी 100, अशोक पाटील, जखिणवाडी 100 असे एकूण 40 हजार 628 रुपये जमा झाले.