Thu, Sep 24, 2020 06:28होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महापौर गवंडी आणि उपमहापौर शेटे यांचा राजीनामा 

कोल्हापूर : महापौर गवंडी आणि उपमहापौर शेटे यांचा राजीनामा 

Last Updated: Nov 08 2019 1:38PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर माधवी गवंडी आणि उपमहापौर भूपाल शेटे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता नूतन महापौर निवडीसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांचे नाव दिले आहे. 

गवंडी यांच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त झाल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे परिणाम महापौर निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. ताराराणी आघाडीच्या वतीने महापौरपदाची निवडणूक ईर्षेने लढविण्यात येणार आहे. परिणामी, महापौर निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांतील फॉर्म्युल्यानुसार एकेक वर्ष महापौरपद वाटून घेण्यात आले आहे. त्यानुसार यंदा राष्ट्रवादीकडे महापौरपद आहे. चार महिन्यांपूर्वी गवंडी व अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्यात पदासाठी रस्सीखेच होऊन अखेर गवंडी यांची महापौरपदी निवड झाली होती. त्यामुळे आता अ‍ॅड. लाटकर यांना राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी संधी देण्यात येणार आहे.

 "