Sat, Feb 29, 2020 11:23होमपेज › Kolhapur › बंटींची 'आमच ठरलं' भूमिका फायद्याची ठरली : संजय मंडलिक

बंटींची 'आमच ठरलं' भूमिका फायद्याची ठरली : संजय मंडलिक

Published On: May 23 2019 12:25PM | Last Updated: May 23 2019 2:11PM
कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय मंडलिक यांना सकाळी साडेअकरापर्यंत जवळपास लाख मतांची आघाडी मिळाली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना, माझ्या यशामध्ये शिवसेना-भाजपसह काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले मतमोजणीच्या १० फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये मला जवळपास लाख मतांनी  आणखी मिळाली आहे. यामध्ये आणखी सातत्याने वाढ होईल असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. 

अधिक वाचा : कोल्हापूर : गोकुळ संचालक अमरीश घाडगे व पोलीस पथकात धक्काबुक्की

मतमोजणीत मोठी आघाडी मिळाल्यानंतर संजय मंडलिक यांच्या घरासमोर जल्लोष सुरु झाला. माझ्यावर खालच्या पातळीवर टीका झाली पण जनतेनं उत्तर दिले, असे म्हणत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण गेल्यावेळी याच मतदार संघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत झाली.