Fri, Nov 27, 2020 10:25होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : मिरजकर तिकटीला सर्व पक्षीय कृती समितीने लावलेल्या 'पायताण' फलकाची चर्चा!

कोल्हापूर : मिरजकर तिकटीला सर्व पक्षीय कृती समितीने लावलेल्या 'पायताण' फलकाची चर्चा!

Last Updated: Nov 22 2020 7:46AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

वीज बिल भरणार नाही कृती समितीने मिरजकर तिकटी येथे लावलेल्या फलक शहरात चर्चेचा विषय बनला आहे. फलकाच्या माध्यमातून ‘सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा..आम्ही बिल भरणार नाही.. सरकारने भरावे’, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळातील वीज बिले भरमसाट आल्याने नागरिकांमध्ये संतप्‍त भावना आहे.

यासंदर्भात सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अद्यापही शासनाने दखल न घेतल्याने कृती समितीने मिरजकर तिकटीला वीज बिल भरणार नसल्याचा फलक लावला आहे. कोरोना काळातील वीज मागणार्‍या सरकारला.. वीज कट करणार्‍याला.. जनतेवर जबरदस्ती करणार्‍याला... खणखणीत झटका.. अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण, असा आशय फलकावर झळकत आहे. फलकावर संपर्कासाठी समितीतील कार्यकर्त्यांचे नंबरही देण्यात आले आहेत.

वाढत्या वीज बिलविरोधात राज्यभरातील जनतेत असंतोष आहे. दरम्यान उर्जामंत्री राऊत यांनी विज बील माफ होण्याचा प्रश्नच येत नसल्याची घोषणे करताच कोल्हापूरी जनतेने पायतानच हातात घेतले. कोल्हापूरकरांनी मात्र, वीज जोडणी तोडाल तर कोल्हापुरी पायताण खाल, असा सज्जड दम महावितरणला कोल्हापूरकरांनी भरला आहे. अशा आशयाचे फलक कोल्हापुरातील चौकात लावण्यात आले आहेत.