Sat, Aug 08, 2020 02:31होमपेज › Kolhapur ›  २४ डिसेंबरला विमानाचे उड्डाण निश्चित : चंद्रकांतदादा पाटील 

 २४ डिसेंबरला विमानाचे उड्डाण निश्चित : चंद्रकांतदादा पाटील 

Published On: Dec 15 2017 10:52PM | Last Updated: Dec 15 2017 10:51PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी महत्वपूर्ण असलेला, 2B डे ऑपरेटींग परवाना आज मिळाला. यामुळे 24 डिसेंबरला विमानाचे उड्डाण आता निश्चित झाल्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच सध्या आठवड्यातून तीन दिवस सुरू असलेली विमानसेवा आठवड्यातून सहा दिवस सुरू राहण्यासाठी केंद्र, राज्य आणि नागरी हवाई वाहतूक संचलनालयाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सहा वर्षापासून खंडीत झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 24 डिसेंबरपासून उडान योजने अंतर्गत सुरू होणार आहे. या विमानसेवेतील प्रमुख अडथळा विमानसेवचा स्लॉट (उड्डाणाची वेळ) होता. या प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून सूचना दिल्या आणि अखेर स्लॉट (उड्डाणाची वेळ) मिळाला. 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विमानसेवची २० डिसेंबरला पूर्वचाचणी होणार आहे. यासाठी महत्वपूर्ण असलेला, 2B डे ऑपरेटींग परवाना प्रलंबित होता आणि हा परवाना आज मिळाला. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने याबाबत आज स्पष्टता केली आहे. डीजीलीएने यावर स्वाक्षरी करून हा परवाना विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द केला आहे. त्यामूळे 20 प्रवासी क्षमता असलेली विमानसेवा आता सुरू होणार आहे. 

सध्या तीन दिवस ही विमानसेवा सुरू होईल परंतू आगामी काळात ही सेवा कायमस्वरूपी म्हणजे आठडयातून सहा दिवस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.