Tue, Jan 19, 2021 23:59होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : २४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : २४ बंधारे पाण्याखाली

Last Updated: Jul 10 2020 2:04PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यातील राधानगरी धरणात १३०.७० दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि खडक कोगे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव व ऐनापूर, ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी व चंदगड, दूधगंगा नदीवरील दत्तवाड व सिध्दनेर्ली, असे एकूण २४ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ४०.९९ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ८४.४६३ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४७.१७ दलघमी, वारणा ५०३.३९ दलघमी, दूधगंगा ४०१.०६ दलघमी, कासारी ४०.९३ दलघमी, कडवी ३३.६५ दलघमी, कुंभी ४२.२४ दलघमी, पाटगाव ६२.३२ दलघमी, चिकोत्रा १९.४१ दलघमी, चित्री २०.४६ दलघमी, जंगमहट्टी १६.२० दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २६.८ फूट, सुर्वे २५.४ फूट, रुई ६६.६ फूट, इचलकरंजी ५२.६ फूट, तेरवाड ४७.६ फूट, शिरोळ ३७ फूट, नृसिंहवाडी ३५ फूट, राजापूर २४.६ फूट तर नजीकच्या सांगली १० फूट व अंकली १२.१० फूट अशी आहे.