Wed, Feb 19, 2020 10:46होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : दगडी गुंडी उचलण्याचा थरार; तब्बल १०० किलोची गुंडी १९ वर्षाच्या पठ्ठ्याने १३ वेळा उचलली! (video)

कोल्हापूर : शंभर किलो दगडी गुंडी उचलण्याचा गिरगावमधील थरार! (video)

Last Updated: Oct 09 2019 4:18PM

या थरारक स्पर्धेत अवघ्या १९ वर्षीय ओंकार रामचंद्र पाटीलने तब्बल १३ वेळा गुंडीला अलगद खांद्यावरून उचलून बाजी मारली.कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

शारिरिक क्षमतेचा आणि बौद्धिक कस पाहण्याचा प्राचीन आणि ऐतिहासिक क्रीडा प्रकार म्हणजे शंभर किलोची दगडी गोलाकार गुंडी उचलणे. मोबाईल दुनियेत असे मैदानी खेळ कालबाह्य होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव गावामध्ये अजूनही  दरवर्षी दसऱ्यात गुंडी उचलण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.

सर्वांधिक काळ गुंडी उचलणाऱ्याला गुंडी सम्राट सन्मान देऊन त्याचा गौरव केला जातो.  ताकदीच्या जोरावर १०० किलो गुंडी उचलून ती खांद्यावरून फिरवण्यास प्रचंड शारिरीक उर्जा लागते. त्यामुळे थोडासा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. अशा या थरारक स्पर्धेत अवघ्या १९ वर्षीय ओंकार रामचंद्र पाटीलने तब्बल १३ वेळा गुंडीला अलगद खांद्यावरून उचलून बाजी मारली. त्याला स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

या स्पर्धेत बलदंड युवक तसेच पन्नाशीच्या घरातील तंदुरुस्त गावातील ग्रामस्थ सहभाग घेतात. काल (ता.०९) मोठ्या उत्साहात गुंडी उचलण्याचा थरार पार पडला. यावेळी संपूर्ण गाव हा मैदानी खेळ पाहण्यासाठी भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात  दाखल झाले होते. या खेळामध्ये गोलाकार गुंडी दगड जमिनीवरून उचलून तो मांडीवरून सरळ खांद्यावर घेऊन न थांबता सर्वांधिक काळ खाली वर करेल त्याचा गौरव केला जातो.