Thu, Feb 27, 2020 23:51होमपेज › Kolhapur › चंद्रकांत पाटलांचे पवारांना आव्हान; महिला आघाडीचे पाटलांना प्रतिआव्हान

चंद्रकांत पाटलांचे पवारांना आव्हान; महिला आघाडीचे पाटलांना प्रतिआव्हान

Published On: May 13 2019 7:10PM | Last Updated: May 13 2019 7:05PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

राज्यातील लोकसभेचे मतदान संपते ना संपते तोच दुष्काळावरुन राज्याचे राजकारण पुन्हा तापले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारात एकमेकांवर टीका करण्याचे सुरु झालेले सत्र अजून सुरु आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना दुष्काळावर कोठेही चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. त्याला कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने चंद्रकांत पाटलांना प्रतिआव्हान दिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा दुष्काळ दौरा सुरु केला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील भाजप शिवसेना सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही. नुसत्या फोन वरुन चौकशी करुन उपयोग होत नाही असा टोला शरद पवारांनी लगावला होता. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना  शरद पवारांना त्यांच्या पंटरांसह ( कार्यकर्त्यांसह) कोणत्याही चौकात चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. आज (दि.१३) कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने चंद्रकांत पाटलांना चर्चेचे आव्हान देत. ताराराणी चौकात ठिय्या मांडला. यावेळी पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

लोकसभा निवडणूक प्रचारावेळी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तेव्हापासूनच शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक वार पटलवार सुरु झाले होते. आता दुष्टकाळाच्या मुद्यावरुन त्याचा पुढचा अंक सुरु झाला आहे.