Mon, Jul 06, 2020 05:26होमपेज › Kolhapur › आपआपसातील मत-मतांतरे पंचगंगेत अर्पण करा : आमदार हसन मुश्रीफ

दुखावलेली मने दोन दिवसांत दुरुस्त करू : खासदार महाडिक

Published On: Mar 24 2019 5:30PM | Last Updated: Mar 24 2019 5:32PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची राष्ट्रपातळीवर आघाडी घोषीत झाली आहे. काल राज्य पातळीवरही आघाडीची घोषणा झाली आहे. कोल्हापूरातून याचा मुहूर्त झाला हे विशेष आहे. तसेच जुन्या गोष्टी सुधारून कार्यकर्त्यांची मने दुखावली असतील तर येत्या दोन दिवसात दुरुस्तू करू असेही खा. महाडिक यावेळी म्हणाले. 

रविवारी कोल्हापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे नेते पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, विद्यमान खासादार धनंजय महाडिक, महापौर सरिता मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी खासदार महाडिक यांनी उपस्थित दोन्ही पक्षांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच आ. हसन मुश्रीफ व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जे आवाहन आणि विनंती केली तिच विनंती आणि आवाहन आपण करत असल्याचे सांगितले. 

माजी आ. पी.एन. पाटील व प्रकाश आवाडे यांनी मोठ्या मनाने व मोठ्या दिलाने येथून पुढच्या निवडणूकांना एकत्रीतपणे समोरे जाण्याची घोषणा आणि ग्वाही दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. आपल्या आवाहनानुसार भविष्यातील सगळ्या निवडणूकींना एकत्रीत सामोरे जावू. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही एकजूट दाखवून देवू. त्यानुसार दोन्ही पक्षांनी एकजूटीने येथून पुढची वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर काही जुन्या गोष्टी सुधारून कार्यकर्त्यांची मने दुखावली असतील ती येत्या दोन दिवसात दुरुस्तू करू असेही खा. महाडिक यांनी सांगितले. 

आपआपसातील मत-मतांतरे पंचगंगेत अर्पण करा : आमदार हसन मुश्रीफ 

बैठकीच्या प्रारंभी सर्वांचे स्वागत करून माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ म्हणाले,  राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या नेत्यांनी दोन्ही काँग्रेस एकसंघपणे भाजप विरोधात लढतील हे कधीच ठरवून टाकले आहे. आपण फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. हे दोन्ही नेते मनाने कधीच एकत्रीत आले आहेत. आपल्यातील मत-मतांतरे होती त्यांना पंचगंगेत अर्पण करूया. आगामी लोकसभेत दोन्ही जागा राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक व मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांना जीवाचे रान करून निवडून आणूया. 

काँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे. आम्ही अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होतो. लहानभाऊ म्हणून काँग्रेसने पदरात घेण्याची विनंती त्यांनी केली. वाद-विवाद न काढता आपला प्रथम शत्रू असणार्‍या भाजप विरोधात एकजूट दाखवा.  साडेचार वर्षात सत्ता नसल्यावर कशी ससेहोलपट होते हे आपण अनुभवले आहे. यामुळे भविष्यात आपले सर्व उमेदवार जिंकून पुन्हा सत्ता मिळविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अधिक वाचा : 

..तर आ. सतेज पाटील यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात

►महायुतीच्या तोफा आज कोल्हापुरातून धडाडणार 

►आ. सतेज पाटील आघाडीचे ऐकत नसतील तर...