Fri, May 07, 2021 18:05
खासदार संजय मंडलीक गटाला धक्का, विरेंद्र मंडलीक पराभूत

Last Updated: May 04 2021 9:25PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

खासदार संजय मंडलीक यांचा मुलगा विरेंद्र मंडलीक व राजेश पाटील यांची पत्नी आणि वीरेंद्र मंडलीक यांची आत्या यांना गोकुळमध्ये पराभवाला सामोरे जावं लागले आहे. दरम्यान विरोधी गटाचे १७ उमेदवार निवडून आले. तर  सत्ताधारी गटाते ४ उमेदवार निवडुन आले. मागच्या कित्येक वर्षांपासून महाडिक गटाची सत्ता होती. सत्तांतरण करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली आहे.

अधिक वाचा : 'सतेज पाटीलांनी गोकुळमध्ये आणला सामान्य कार्यकर्ता'

गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. गोकुळला मल्टिस्टेट करण्यावरून मागच्या दोन वर्षांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच लढाई सुरू होती. विरोधी गटाचे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा चंग बांधला होता. यावरून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती. याचाच फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे दिसून आले.