Sat, Jul 04, 2020 07:33होमपेज › Kolhapur › इचलकरंजीतील वृद्धाला कोरोनाची लागण, संपर्कातील १८ जणांची तपासणी

इचलकरंजीतील वृद्धाला कोरोनाची लागण, संपर्कातील १८ जणांची तपासणी

Last Updated: Jun 02 2020 1:52PM
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी येथील वर्धमान चौकातील वंदे मातरम मैदानासमोरील ६८ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. या वृद्धाचा कोरोना चाचणी अहवाल आज ( दि. २ )  पॉझिटिव्ह आल्याने भागात खळबळ उडाली.

या वृद्धाला सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ताप आल्यामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचाणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान,  आज अहवाल तो अहवाल प्राप्त झाला त्यात तो वृद्ध पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 

या वृद्धाच्या प्रथम संपर्कात आलेल्या १० जणांची यादी पालिका प्रशासनाने तयार केली असून त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.