Fri, Oct 30, 2020 18:24होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून

कोल्हापूर : पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून

Last Updated: Sep 25 2020 4:19PM

संग्रहीत छायाचित्रकोल्हापूर (पन्हाळा) : पुढारी ऑनलाईन

मागील चार दिवसांपासून पती पत्नींमध्ये घरगुती वाद सुरू होता. या रागातून पत्नीच्या डोक्‍यात लोखंडी घण घालून पतीने हत्या केल्याची भयानक घटना घडली. पन्हाळा तालुक्यातील माले या गावी ही घटना घडली. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. हत्या केल्यावर आरोपी दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलीस ठाण्यात हजर झाला. या ह्रदयद्रावक घटनेने पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

मागच्या १० वर्षांपुर्वी दत्तात्रय आणि शुभांगी यांचा विवाह झाला होता. त्यांना ८ आणि ४ वर्षांची दोन मुलं आहे. दरम्यान त्यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरून नेहमी वाद सुरू असायचे. दत्तात्रय आणि शुभांगी यांच्यात अचानक पहाटेच्या सुमारास वाद सुरू झाला. या वादाच्या रागातून दत्तात्रयने पत्निच्या डोक्यात लोखंडी हातोडा घातला. यामुळे पत्नि जागीच ठार झाली.

पोलिसांच्या माहितीनूसार दत्तात्रय हा खुन करून स्वतःहून कोडोलीत पोलिसांत दाखल झाला. दरम्यान ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दत्तात्रयवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

 "