Sat, Sep 19, 2020 08:20होमपेज › Kolhapur › ‘अलमट्टी’वर लवकरच उच्चस्तरीय बैठक

‘अलमट्टी’वर लवकरच उच्चस्तरीय बैठक

Last Updated: Jul 04 2020 1:12AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘अलमट्टी’च्या पाणी विसर्गाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असून लवकरच बैठक होईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी सांगितले.

वडेट्टीवार म्हणाले, गतवर्षी महापुराने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत दोन्ही राज्यांत उच्चस्तरीय बैठक आवश्यक आहे. तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून लवकरच या बैठकीतून मार्ग काढला जाईल. राज्यात वीज पडून दरवर्षी सुमारे 300 लोकांचा मृत्यू होतो. यामुळे अशा वीज प्रवाह गावात वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 27 हजार गावांमध्ये अशी यंत्रणा बसवली जाईल. आपत्तीग्रस्तांना देण्यात येणार्‍या मदतीच्या निकषांमध्ये बदल करण्?यात येणार आहे असे सांगत ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना ती निकषांपेक्षा बदलून अधिक देण्यात आली.

फडणवीस यांच्यासाठी दोन दिवसांचा कालावधी जास्तच

मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असते तर त्यांनी कोरोनाचा प्रश्‍न दोन दिवसांत सोडवला असता, असे वक्‍तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याबाबत विचारता फडणवीस यांच्यासाठी दोन दिवसांचा कालावधीही जास्तच आहेत, असा उपरोधिक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
 

 "