Tue, Aug 11, 2020 21:21होमपेज › Kolhapur › आनंदवन आश्रमास मदत; महिलांनी जपले 'ऋणानुबंध' 

आनंदवन आश्रमास मदत; महिलांनी जपले 'ऋणानुबंध' 

Last Updated: Dec 07 2019 1:29PM

ऋणानुबंध महिला ग्रुपतर्फे आनंदवन आश्रमास मदत 

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात मध्यम व उच्च वर्गीय महिलांच्या सामाजिक तळमळीतून कार्यरत असलेल्या 'ऋणानुबंध' या सामाजिक महिला ग्रुपच्या महिला सदस्यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ या तिन्ही आश्रमांना भेटी देऊन त्यांना आर्थिक मदत केली आहे.

एका वेगळ्या सामाजिक ध्येयाने एकत्र आलेल्या या ग्रुपच्या महिला सदस्यांनी चालू वर्षी गडचिरोलीसारख्या नक्षली भागात जाऊन बाबा आमटे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांना सहाय्य करण्याची  तळमळ जपली या महिलांच्या धाडसी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या  उपक्रमाचे संयोजन उमा कुलकर्णी यांनी केले आहे. त्‍यांना आनंद कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

कोल्हापूर, गारगोटी, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या गारगोटीच्या सासुरवासिणी व माहेरवासिणी असलेल्या अनेक मध्यम उच्चमध्यम वर्गातील महिला या ग्रुपच्या सदस्या आहेत. समाजाचे काहीतरी देणे लागतो आहे, असा मनोदय जपत या ग्रुपच्या महिला सदस्या दरवर्षी सामाजिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे स्थानाला भेटी देऊन तेथे आर्थिक सहकार्य करतात. तसा उद्देश या ऋणानुबंध ग्रुपचा आहे.

गतवर्षी या महिलांनी यांच्या कार्याची नोंद घेऊन भेट दिली व आर्थिक सहकार्य केले. त्यापूर्वी प्रथम सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला भेट देऊन मदत केली. याच महिलांनी विकासाचा लवलेशही माहीत नसलेल्या कीट्टवडे  गावातील शाळेस भेट देऊन तेथील निरागस मुलांना सॅक व शालेय साहित्य वाटप केले आहे.

आर्थिक मदत करून या महिला परतल्या आहेत. दरम्यान कोल्हापूरची माणसं म्हणजे माझ्या माहेरची माणसं आपल्याला भेट वस्तू घेऊन आल्यासारखे वाटले अशी भावना डॉ. विकास आमटे यांनी यावेळी महिलांच्या समोर व्यक्त केल्या.

 उमा कुलकर्णी यांनी सांगितले की, या स्तुत्य उपक्रमासाठी आनंद कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमांमध्ये उमा  कुलकर्णी, अनिता पाटील, स्नेहा पंडित राव, अश्विनी घोले, मृदुला मोरे, उज्वला देशपांडे, मीना वाघरे, संपदा पवार ,सविता पाठक, आसावरी पाटील, संपूर्णा जव्हेरी, नुतन भालकर, माधुरी शेवडे , क्षितिजा मोरे सरिता खोत, देवयानी पलुसकर, माधवी कुलकर्णी या महिला सहभागी होत्या.