Fri, Oct 30, 2020 04:08होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गोलमेज परिषद सुरु, पहा Live...

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गोलमेज परिषद सुरु, पहा Live...

Last Updated: Sep 23 2020 2:00PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्याने सरकारने घ्यावयाची भूमिका व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात बुधवारी राज्यव्यापी गोलमेज परिषद होत आहे. साने गुरुजी वसाहतमधील रावजी सांस्कृतिक भवनमध्ये दुपारी सव्वाबारा वाजता ही परिषद सुरु झाली.

या परिषदेत मराठा समाजाला नोकरीत 13 टक्के, शिक्षणात 12 टक्के आरक्षण देण्याबाबत चर्चा होत आहे. यामध्ये सुरेश पाटील,  वसंतराव मोरे, नामदेवराव जाधव, चंद्रकांत भराट, सुनील अप्पा मोरे, वामनराव भिलारे, चंद्रकांत सावंत, सुशांत पाटील, अविनाश पोवार, सुधाकर माने भूमिका मांडत आहेत. परिषदेत विविध ठराव मांडून ते शासनाला सादर करण्यात येणार आहेत. मेगा नोकर भरती, शैक्षणिक फी मध्ये सवलत या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा होणार आहे.

 "