Sat, Sep 19, 2020 08:42होमपेज › Kolhapur › सोने @ 51,000

सोने @ 51,000

Last Updated: Jul 10 2020 1:35AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने सोने दरात प्रचंड तेजी आली आहे. परिणामी, कोल्हापुरात प्रथमच गुरुवारी सोने दर प्रतितोळा 51 हजार रुपयांवर गेला होता. गेल्या आठ दिवसांत सोने दरात 1,500 रुपयांची वाढ झाली असून, सोने दरातील हा उच्चांक मानला जात आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने प्रतिऔंस दर 1,800 डॉलर्सच्या पुढे गेला आहे. दहा दिवसांपूर्वी सोने प्रतितोळा 49 हजार ते 49 हजार 200 रुपयांच्या आसपास होते. यामध्ये तेजी-मंदी कायम होती. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सराफ व्यवसाय मंदीत होता. आता काही अटींवर शासनाने सराफी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे; तोच सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत   सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात असल्याने त्याचे भाव वाढत चालले आहेत. गेल्या दहा वर्षांत सोन्याचा प्रतिऔंसचा दर 1,808 डालर्सवर गेला आहे.

दरम्यान, कोल्हापुरात सोने जीएसटीसह प्रतितोळा 51 हजार रुपयांवर गेले आहे. गेल्या आठ दिवसांत 1,500 रुपयांची वाढ झाली असून, सोने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले.

 "