Fri, May 07, 2021 19:09
गोकुळमध्ये सत्तांतर अटळ? विरोधी आघाडीची जोरदार मुसंडी

Last Updated: May 04 2021 8:24PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

गोकुळच्या सहाव्या फेरीअखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाचे १४ उमेदवार आघाडीवर आहेत तर महाडिक गटाचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे पराभव झाला. यामुळे विरोधी गटाची गोकुळवर सत्तांतर झाले आहे मागील कित्येक वर्षांपासून महाडिक आणि पी एन पाटील यांच्या गटाची सत्ता होती.  

अधिक वाचा : 'सतेज पाटीलांनी गोकुळमध्ये आणला सामान्य कार्यकर्ता'

मागच्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील यांच्या गटाचे गोकुळमध्ये वर्चस्व कायम राहिले आहे. यावर्षी मात्र गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. गोकुळला मल्टिस्टेट करण्यावरून मागच्या दोन वर्षांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच लढाई सुरू होती. विरोधी गटाचे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मल्टिस्टेट होऊ न देण्याचा चंग बांधला होता. यावरून जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती. याचाच फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याचे दिसून आले.

अधिक वाचा : गोकुळ निवडणूक LIVE: विरोधी गटाच्या १२ जागा आघाडीवर

गोकुळच्या चौथ्या फेरी चौथ्या फेरीअखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाच्या १३ उमेदवारांची आघाडी कायम आहे. तर सत्ताधारी गटातील ३ जागा आघाडीवर आहेत. दरम्यान विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे पराभवाच्या छायेत आहेत. यामुळे विरोधी गटाची गोकुळवर मजबूत पकड होताना दिसत आहे.