Fri, Sep 18, 2020 18:23होमपेज › Kolhapur › हसन मुश्रीफांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

हसन मुश्रीफांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

Last Updated: Dec 30 2019 1:43PM

आमदार हसन मुश्रीफपुढारी ऑनलाईन डेस्क 
 

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. ३६ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

अधिक वाचा : अखेर काँग्रेसची यादी आली!; सतेज पाटील, विश्वजित कदमांना संधी; पृथ्वीराज चव्हाणांचा पत्ता कट

कोल्हापुरातून तिघांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. काँग्रेसकडून सतेज पाटील (राज्यमंत्री), राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ (कॅबिनेट), तर शिवसेनेकडून अनपेक्षितपणे शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (राज्यमंत्री) यांना संधी मिळाली. आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफांनी सीमा भागाचा उल्लेख केला. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर समारोप त्यांनी 'जय हिंद, जय सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्र' असा केला.

अधिक वाचा : मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून कोल्हापुरातून 'यांना' संधी मिळाल्याची चर्चा!

तत्पूर्वी सकाळी प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, की भाजपने सुडाचे राजकारण केल्यामुळे शिवसेना-भाजपला बहुमत मिळूनही त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. परमेश्वराच्या मनातही तेच होत. शरद पवारांकडे मी कधी काही मागितले नाही, ते सांगतील ते काम मी करत गेलो. आजही ते देतील ते मंत्रिपद मी स्वीकारीन. मागच्या आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्री असताना मी गोरगरिबांची सेवा केली. आजही या मंत्रिपदाच्या माध्यमातून मी तेच कार्य अव्याहतपणे करणार आहे. 

 "