Sat, Feb 29, 2020 12:59होमपेज › Kolhapur › अर्थसंकल्पात शैक्षणिक दर्जा केंद्रस्थानी : प्रा. कोंबडे (Video)

अर्थसंकल्पात शैक्षणिक दर्जा केंद्रस्थानी : प्रा. कोंबडे (Video)

Published On: Feb 01 2018 5:02PM | Last Updated: Feb 01 2018 8:38PMकोल्हापूरः पुढारी ऑनलाईन

आज लोकसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी विशेष भर दिल्याचे दिसून आले. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध तरतूदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. 

याबाबत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे सहा. प्राध्यापक सुभाष कोंबडे यांनी सागिंतले कि, या अर्थसंकल्पात शिक्षणाविषयी भरीव तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दिसत आहे. शैक्षणिक दर्जा हा या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसते. १३ लाख शिक्षकांना डिजीटल शिक्षणासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही बाब महत्वाची आहे.

भारतीय विद्यापीठांमधील एकही विद्यापीठ जागतिक यादीत पहिल्या २०० मध्ये नसल्याने याचा गांभीर्याने विचार करून सरकारने गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला आहे. कौशल्य विकास साध्य करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सर्वोच्च असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी आणि मागास प्रवर्गाच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. वैद्यकीय सेवा वाढवण्यासाठी देशात नव्या २४ वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत शिक्षणासाठी या   अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याचे दिसत आहे असे, प्रा. कोंबडे यांनी सांगितले.