Sun, Sep 27, 2020 03:47होमपेज › Kolhapur › कोल्हापूरमध्ये आणखी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूरमध्ये आणखी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: May 26 2020 10:10PM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात आज, मंगळवारी आणखी पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८३ झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच चालला आहे. सोमवारी ३७ नव्या रुग्णांची त्यात भर पडली होती. यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३७८ झाली होती. आज आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे रुग्णांची संख्या ३८३ वर पोहोचली. शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत आहेत. 

जिल्ह्यात दि. १२ मेपासून रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. मुंबईहून सर्वाधिक नागरिक आलेल्या आजरा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात रेड झोनमधून आलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. दि. ९ मेपासून आढळणारा प्रत्येक रुग्ण हा जिल्ह्याबाहेरून प्रवास करून आलेला आहे. स्थानिक रुग्ण आढळणार नाही अथवा त्याला बाधा होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. याकरिता रेड झोनमधून येणार्‍यांचे सक्‍तीने इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असतानाही जिल्ह्यात समूह संसर्ग झालेला नाही. ही दिलासादायक बाब असली, तरी जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या आणखी वाढणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्याबाबतही नियोजन सुरू केले आहे.

 "