Fri, Sep 25, 2020 13:40होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कोरोना कर्फ्यू मजूर जनतेच्या पोटावर

कोल्हापूर : कोरोना कर्फ्यू मजूर जनतेच्या पोटावर

Last Updated: Mar 26 2020 11:23AM
अनेक मजुरांच्या डोळ्यात पाणी : सरकारने दखल घेण्याची मागणी 

हुपरी : अमजद नदाफ 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कर्फ्यूचा आजचा पाचवा दिवस असून सर्वसामान्य शेतमजूर, गवंडी कामे, फेरीवाले, चांदी कारागीर, धाडी उत्पादक आणि ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांच्या घरातील चूल बंद होण्याच्या मार्गावर असून अशा मजुरांना सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. रोजगार नसल्याने लोक अस्वस्थ आहेत.

वाचा - परळी वैजनाथ: अफवांना ऊत, अंधश्रदेच्या बाजाराने अनेक गावे जागली!

कोरोनाने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करुन या आपत्तीला परतवून लावण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र सरकारने २२ मार्चला कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे गेली पाच सहा दिवस अनेकांना कामे नाहीत. ज्याना कामावर गेल्यावरच रात्री चूल पेटते, अशांना उपाशीच राहावे लागत आहे. २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा झाल्याने आणि कामे नसल्याने या कुटुंबांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे आता जगायचे कसे? असा प्रश्न पडला आहे.

वाचा - अंबाजोगाई : पोलिसांची नजर चुकवून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ४ जणांविरूद्ध गुन्हा

हुपरी परिसरातील दहा गावे चांदी उद्योगांवर अवलंबून आहेत. सध्या हा उद्योग पूर्ण बंद आहे. भविष्यात दोन चार महीने उद्योगात दीर्घकालीन मंदीचे संकेतही आहेत. त्यामुळे या उद्योगातील धडी उत्पादक, कारागीर आणि चांदी उद्योगाला पूरक असणाऱ्या शेकडो कुटुंबे हतबल झाली आहेत. अनेक छोटे-मोठे उद्योगातील कामगार वर्गाची अशीच अवस्था आहे. त्यामुळे कर्फ्यू जरी कोरोना च्या प्रतिबंधासाठी असला तरी तो या कामागराच्या मुळावर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे शासनाने त्यांना पाठबळ देण्याची गरज असtन त्यादृष्टीने निर्णय व्हावा अशी मागणी होत आहे.

ध्या लॉकडाऊनमुळे गरीब जनतेची मोठी दैना उडाली आहे. पुढे पंधरा दिवसाहून अधीक काळ अशीच स्थिती राहणार आहेत. त्यानंतरही उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने होणे अवघड आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून अशा गरीब कुटुंबांना आणि मजुरांना दोन महिने पुरेल इतके अन्न, धान्य मोफत मिळावे .

- मंगलराव माळगे, राज्य सचिव रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया
 

 "