Mon, Dec 16, 2019 07:11होमपेज › Kolhapur › मी माझ्या कामाचा हिशोब घेऊन आपल्‍यासमोर  : महाडिक

मी माझ्या कामाचा हिशोब घेऊन आपल्‍यासमोर  : महाडिक

Published On: Apr 18 2019 2:05AM | Last Updated: Apr 17 2019 9:04PM
कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

माझ्या कार्यकाळात मी ८ हजार कोटींची कामे केली. कोल्हापूरचा शिवाजी पुलाचा प्रश्न रखडला तो मी मार्गी लावला. माझ्या धडासमुळे प्रश्न मार्गी लावले. त्‍यामुळेच मला संसद रत्न मिळाला. याच माझ्या कामाचा हिशोब घेऊन मी आपल्‍यासमोर आलो आहे, असे मत खा. धनंजय महाडिक यांनी व्यक्‍त केले.  

खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्‍या सभेत ते बोलत होते. महाडिक म्‍हणाले, ‘‘पवार साहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे मी यशस्वी झालो आहे. कोकण रेल्वे, सरकारी हॉस्पिटलची कामे मी मार्गी लावली. २००८ ला पवार मंत्री असताना कै. सदाशिवराव मंडलिक यांनी तक्रार केली म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांची कर्ज माफी रद्द केली.’’

‘‘शेतकऱ्यांना पेंशन मिळाली पाहिजे, बौद्ध समाजाच्या विहार सुधारण्यासाठी, अंगणवाडी, कोल्हापूर् झोपडपट्टी रेशन प्रश्न, जीएसटी कार्यालय सुधारण्यासाठी, मराठा समाजाचे आरक्षण पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्‍न असणार, महिला द्योजकांसाठी, आशा अनेक प्रश्नांसाइी मी प्रयत्‍न करेन, असे मतही महाडिक यांनी व्यक्‍त केले.