Mon, Jan 18, 2021 15:22होमपेज › Kolhapur › डेंग्यूचा डंख

डेंग्यूचा डंख

Published On: Jul 10 2019 1:39AM | Last Updated: Jul 10 2019 12:34AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये सध्या डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू होणार्‍यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. डासांकडून होणार्‍या या आजारांबद्दल जनजागृती कमी असल्याने वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत तर अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे डेंग्यूला कायमचेच नष्ट करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. डासांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने डासांची उत्पत्ती होणार्‍या प्रत्येक गोष्टीचा नायनाट करण्यासाठी जबाबदार आरोग्य यंत्रणा व विविध संस्था, संघटना, मंडळे, महिला बचत गटांनी एकत्र येऊन डेंग्यूला हद्दपार करण्याची मोहीम राबवण्याची गरज आहे. 

आरोग्य विभागाची 16 पथके कार्यरत
कोल्हापूर : प्रतिनिधी
कळंबा (ता. करवीर) येथे दि. 25 जूनपासून सुरू असलेल्?या डेंग्यू सर्वेक्षण मोहिमेत संशयित 25 रुग्णांपैकी 15 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य विभागामार्फत एकूण 16 पथके कार्यरत असून पथकामार्फत 10 दिवस सर्वेक्षण मोहीम आजअखेर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये धूरफवारणी, जळके ऑईल व गटारी वाहती करण्यात आली आहे. 7 ठिकाणी गप्पी मासे सोडले आहेत. डेंग्यूच्या डासांच्या अळ्या, अळ्या असलेले पाणीसाठे नष्ट केले असून येथील अनेक पाणीसाठ्यांमध्ये टेमिफॉस टाकण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत व्हेंट पाईपच्या 1500 जाळ्या बसविण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. 

जिल्ह्यामध्ये जानेवारी 2019 पासून आजअखेर ग्रामीण भागामध्ये 149 डेंग्यू रुग्ण आढळून आले. डेंग्यूची साथ होऊ नये म्हणून प्रत्येक गावोगावी  त्यामध्ये धूरफवारणी, पाणी साचलेल्या ठिकाणी जळके ऑईलचा वापर करून व गटारी वाहती करण्?यात यावीत. विविध ठिकाणी गप्पी मासे सोडावेत. गप्पीमासे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. डेंग्यू डासांच्या अळ्या, अळ्या असलेले पाणीसाठे नष्ट करण्?याबाबत आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्?यात येत आहे. 
जिल्ह्यामध्ये खासगी रुग्णालयामध्ये दाखल होऊन डेंग्यू रोग निदान झाल्यास संबंधित रुग्णांचे रक्‍तनमुने पुनर्पडताळणी केल्यानंतरच डेंग्यू रुग्ण घोषित करण्यात यावा. यासाठी रक्‍ताची पुनर्पडताळणी  करून उपचार करण्यात  येत आहेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत. जिल्?हा परिषद अध्?यक्ष शौमिका महाडिक यांनी डेंग्यू रोखण्?यासाठी जे धूर फवारणी मशिन, पेट्रोल, डिझेल तसेच मनुष्?यबळ आरोग्?य विभागाने सर्व ग्रामपंचायतींना उपलब्?ध करून द्यावे, असे आदेश दिले आहेत.


बेसमेंटचे धोरण कागदावरच
कोल्हापूर : प्रतिनिधी
मुंबई शहरात डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना केली जाते. ज्या घरात किंवा कार्यालयात डेंग्यूच्या अळ्या किंवा डास सापडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कोल्हापूर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी बेसमेंटला पाणी साचून राहणार्‍या मिळकतींवर फौजदारी दाखल करण्याची घोषणा केली. पण ती कागदावरच राहिली. 

प्रबोधन उपक्रमासह दंडात्मक कारवाई केल्याखेरीज डेंग्यूच्या अटकावासाठी सर्वसमावेशक पावले उचलली जाणार नाहीत. डेंग्यूस कारणीभूत असलेल्या एडीस डासांची अंडी पाण्यावाचून वर्षभर जिवंत राहतात. परिणामी पावसाळा सुरू झाल्यानंतर गोडे पाणी मिळताच ही अंडी उबवणुकीची प्रक्रिया सुरू होते. गोड्या पाण्याचे साठे आठ दिवसांपेक्षा अधिक काळ होणार नाहीत, बेसमेंटला पाणी साचणार नाही, डेंग्यूबाबत  प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जागृती करण्याची गरज आहे. मागील वर्षी शहरात जानेवारी महिन्यापासूनच डेंग्यूने उचल खाल्‍ली होती. यंदा मे महिन्यानंतर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. 

जून महिन्यात डेंग्यूने चांगलीच उचल खाल्ल्याचे दिसते. महापालिका प्रशासनाने घर टू घर मोहीम आखून सर्वेक्षण सुरू केले आहे.  मागील वर्षी सुमारे दहा हजार ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्या होत्या. या ठिकाणी आतापासून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज आहे. महापालिका प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनी डेंग्यूबाबत सजग राहून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात. काय आहे डेंग्यू? डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्यामुळे डेंग्यू होतो. डेंग्यूचे डास गोड्या पाण्यातच जन्मतात. विशेष म्हणजे हे डास दिवसाच चावतात. एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्‍तस्रावात्मक ताप (डीएचएफ) या दोन प्रकारे हा रोग होतो. डेंग्यू ताप हा एक तीव—, फ्लूसारखा आजार आहे. डेंग्यू रक्‍तस्रावात्मक तापामुळे मृत्यू ओढवू शकतो. 

डेझर्ट कूलर्स, ड्रम, बरण्या, भांडी, बादल्या, फुलपात्रे, कुंडीखालील बशी, टाकी, बाटल्या, डबे, टायर्स, वळचण, फ—ीजचं पाणी साठण्याचं पात्र, सिमेंटचे ब्लॉक्स, मडकी, नारळाच्या करवंट्या, झाडातील ढोल्या आणि ज्या ठिकाणी पावसाचे पाणी याठिकाणी सहज उत्पत्ती होते. घरात गोड्या पाण्याचा आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस साठा करू नये. खबरदारी हाच उपाय उपचारांपेक्षा खबरदारी केव्हाही चांगली असते. डेंग्यू किंवा डीएचएफच्या प्रतिबंधात्मक उपचार म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. एडीस इजिप्ती डासावर नियंत्रण मिळवणे हाच एकमेव उपाय आहे. डास चावणार नाहीत याची काळजी घ्यावी.  कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे फायद्याचे 
ठरते.

काय आहे डेंग्यू...
 डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्‍तस्रावात्मक ताप या दोन प्रकारे हा रोग होतो.

 एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्यामुळे होतो. 

 या डासांची उत्पत्ती गोड्या पाण्यात होते.  ते दिवसा चावा घेतात.

 एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो.

 डेंग्यू ताप हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे.

 डेंग्यूच्या रक्‍तस्रावात्मक तापामुळे मृत्यू ओढवू शकतो.

डेंग्यूची लक्षणे
  स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना

  चव आणि भूक नष्ट होणे

  छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे

  मळमळणे आणि उलट्या

  एकदम जोराचा ताप चढणे

  डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे

  डोळ्यांच्या मागील भागात वेदना, जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते

उपाय आणि दक्षता...
गोड्या पाण्याचे साठे अधिक दिवस राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. डासांच्या पैदाशीच्या जागा शोधून काढून त्या नष्ट कराव्यात. डास निवारक क्रिम्स, लिक्‍विड, कॉईल्स, मॅटस्चा वापर करावा. संपूर्ण बाही असलेले शर्ट आणि सॉक्ससह संपूर्ण पँट घालणे. लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी. दिवसा मच्छरदाणीचा वापर करणे. शोभेच्या टाक्यांमध्ये, कारंजा इत्यादींमध्ये डासांच्या अळ्या खाणारे मासे सोडावेत. मोठ्या टाक्यांमध्ये पुनरुत्पादन आढळल्यास तेथे अबेटसारखे रासायनिक अळीनाशक टाकावे. गोड्या पाण्याचा साठा आठ दिवसांपेक्षा अधिक करू नये. शक्य झाल्यास आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. परिसर स्वच्छ ठेवावा. अडगळीच्या वस्तू घरात किंवा घराबाहेर ठेवू नयेत.