Sun, Sep 20, 2020 07:23होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजमधील कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू

गडहिंग्लजमधील कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू

Last Updated: Aug 07 2020 10:33AM

file photo गडहिंग्लज (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लजमधील कोरोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गडहिंग्लज शहरातील कोरोनाचा हा पहिला बळी असून तालुक्यांमध्ये आठ जणांचे बळी गेले आहेत.

गडहिंग्लज शहरांमध्ये कार्यरत असलेल्या एका 70 वर्षे डॉक्टरांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी दवाखान्यांमध्ये हलवण्यात आले होते गेले. आठ दिवस ते कोरोनाशी रोगाची लढा देत होते. मात्र, काल रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने झाल्याने प्रशासनाकडून त्यांच्यावर शर्थीचे उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याला यश आले नाही. रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. गडहिंग्लज शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला असून तालुक्यांमध्ये आठ बळी झाले आहेत.

दरम्यान, गडहिंग्लज शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील एक नर्स आणि हेब्बाळमधील बँक ऑफ इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. गडहिंग्लज शहरात आज नवीन ४ बाधित आढळले असून तालुक्यातील महागावमध्ये २, कडगाव २, गिजवणे व मुगळीमध्ये प्रत्येकी एक असे १० रुग्ण  वाढले आहेत.
 

 "