कोरोना : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक सुविधा

Last Updated: Mar 26 2020 3:17PM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या किंवा तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाच व्हॉट्सॲप क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहेत. हे क्रमांक २४ तास आणि सातही दिवस कार्यरत राहणार आहेत. 

व्हॉटसॲप क्रमांक असे - 

93 56 71 65 63

93 56 73 27 28 

93 56 71 33 30 

93 56 75 00 39 

93 56 71 63 00 

यावरील व्हॉट्सॲप क्रमाकांवर नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत संदेश पाठवावेत. हा संदेश खाली दिलेल्या स्वरूपात असावा. 

नाव - 

मोबाईल नं. - 

तक्रारीचे स्वरूप - 

खोटी माहिती अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष संपर्कासाठी 1077 आणि 0231- 2659232 हे क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

हसन मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री)   

सतेज (बंटी) डी. पाटील (पालकमंत्री, कोल्हापूर)    

राजेंद्र पाटील- यड्रावकर (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य)    

दौलत देसाई (जिल्हाधिकारी, कोल्हापूर)