होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण 

कोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण 

Last Updated: May 29 2020 6:14PM

संग्रहीक छायाचित्रकौलव : पुढारी वृत्तसेवा

आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथे संस्थात्मक विलगीकरण केलेला तरूण कोरोना बाधित निघाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोगावती परिसरात हा पहिलाच रुग्ण आहे.

राधानगरी तालुक्यात कोरोनाचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. आज तालुक्यात फेजिवडे येथे तीन रुग्ण सापडले. तर आटेगाव, कंदलगाव, आमजाई व्हरवडे, मांडरेवाडी व मोघर्डे येथे प्रत्येकी एक असे एकूण आठ रूग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या ५८ झाली आहे. आज मोघर्ड येथील सहा वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात आतापर्यंत मुंबई व बाहेर गावाहून आलेल्या पश्चिम भागातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यापैकी भोगावती काठावरील खिंडी व्हरवडे येथे तीन संसर्गित रूग्ण सापडले होते. त्यांचा गावाशी संपर्क आलेला नव्हता. ते रूग्ण बरेही झाले आहेत. मात्र आज आमजाई व्हरवडे येथे मुंबईहून आलेला तरूण संसर्गित आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरूणासह पाच जण मुंबईहून आले होते. त्यांना एका मंगल कार्यालयात संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यापैकी एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा तरूण आमजाई व्हरवडे येथे आजोळी आला होता. स्थानिक पातळीवर विलगीकरण झालेला हा पहिलाच रूग्ण आहे.

वाचा :कोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश