Tue, May 26, 2020 14:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ब्रेकिंग : सीपीआर कोरोना कक्षातील संशयित ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर ब्रेकिंग : सीपीआर कोरोना कक्षातील संशयित ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Last Updated: Mar 30 2020 10:27AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला उपचारासाठी संशयित म्हणून कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तथापि त्यांचा अहवाल अजून प्रलंबित असल्याची माहिती सीपीआरमधील अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली. दरम्यान, मृत रुग्ण हातकणंगले तालुक्यातील असून त्याचे वय ६५ आहे. त्यांना सर्दी, खोकल आणि श्वसनाचा त्रास होता. 

दरम्यान, कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. मंगळवार पेठ परिसरातील भक्तिपूजा नगरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या 45 वर्षीय महिला नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे. 

दरम्यान, 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 39 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.जिल्ह्यात गुरुवारी (दि. 26) कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरातील भक्तिपूजा नगरमधील एका 37 वर्षीय तरुणाला तसेच पेठवडगाव येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. पेठवडगाव येथील युवतीवर मिरज येथे, तर भक्तिपूजा नगरमधील तरुणावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.